पेठरोडला अज्ञात वाहनाची माय लेकीला धडक; मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 08:19 PM2020-02-03T20:19:23+5:302020-02-03T20:25:04+5:30

पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपटटी समोर वडाच्या झाडाखाली बसलेल्या माय-लेकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लेकीचा मृत्यू ...

Unidentified vehicle to Peth Road beats My Lake | पेठरोडला अज्ञात वाहनाची माय लेकीला धडक; मुलगी ठार

पेठरोडला अज्ञात वाहनाची माय लेकीला धडक; मुलगी ठार

Next
ठळक मुद्देआई गंभीर जखमी झाली चालकाने घटनास्थळावरून पलायन केले

पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपटटी समोर वडाच्या झाडाखाली बसलेल्या माय-लेकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लेकीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे काल रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अपघात घडला. अपघाताबाबत अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताबाबत सविता गणेश जाधव या महिलेने पंचवटी लिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जाधव यांची बहीण लता आनंदा शेवरे (22) ती ठार झाली तर तिची आई शांताबाई वळवी गंभीर जखमी झाली आहे. रविवारी (दि.2) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला लता शेवरे, तिची आई शांताबाई वळवी अशा दोघी अंबिकानगर झोपडपट्टी समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली उन्हात बसलेल्या होत्या त्याच वेळी पेठरोडकडून आरटीओकडे जाणाऱ्या एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकीने दोघींना उडविले. सदर अपघातात दोघींना हाताला, पायाला, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना लताचा मृत्यू झाला तर तिची आई शांताबाई गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर संशयित चालकाने अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पलायन केले म्हणून त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले करीत आहे.

Web Title: Unidentified vehicle to Peth Road beats My Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.