मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:57 IST2018-12-15T21:54:47+5:302018-12-15T21:57:20+5:30

नाशिक : मुलाचे शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़ नितीन शिवाजी शिंदे (३८, रा. घर नंबर ५२, गीतामाई सोसायटी, जाधव संकुल, कामटवाडा, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

Unfortunate death in a father's accident in school | मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

ठळक मुद्देमहात्मानगर परिसरातील घटनादुचाकीचा कट लागल्याने अपघातमुलगा गंभीर

नाशिक : मुलाचे शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़ नितीन शिवाजी शिंदे (३८, रा. घर नंबर ५२, गीतामाई सोसायटी, जाधव संकुल, कामटवाडा, नाशिक) असे अपघातातमृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेतून सावरत शिंदे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत मयत नितीन शिंदे यांचे नेत्रदान करून आदर्श ठेवला आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाड्यातील जाधव संकुल परिसरातील रहिवासी नितीन शिंदे यांचा आठ वर्षीय मुलगा प्रसन्न हा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहे़ शनिवारी सकाळी प्रसन्न यास नेहमी घेण्यासाठी येणारे वाहन न आल्याने सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते शाळेत सोडण्यासाठी अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून (एमएच १५ जीई ७०३८) जात होते़ एबीबी सिग्नलकडून महात्मानगरमार्गे जात असताना जुने आयडिया कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस कट मारल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी झाडावर जाऊन आदळली़ या अपघातात मुलगा प्रसन्न हा एका बाजूला फेकला गेला, तर झाडावर आदळल्याने नितीन शिंदे यांच्या डोक्यास व छातीस जबर मार लागल्याने त्यांना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गडे यांनी तपासून मयत घोषित केले़

या अपघातानंतर संबंधित वाहनचालक फरार झाला, तर घटनास्थळी अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता़ या रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी जखमी अवस्थेतील प्रसन्नच्या गळ्यातील शाळेचे ओळखपत्र पाहून गंगापूर पोलिसांना माहिती दिली़ यानंतर गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ या अपघातातील जखमी प्रसन्नवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे़ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती़ या घटनेमुळे जाधव संकुल परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Unfortunate death in a father's accident in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.