शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी :  सिडकोतील तरुणाचा वालदेवी धरणात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:25 IST

नाशिक सिडकोतील पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहणाऱ्या कमलेश सोनवणे या तरुणाचा वालदेवी धरणात बुडून झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास घडली आहे.. यापूर्वी १६ एप्रिल रोजी वालदेवी धरणात सिडको परिसरातूनच पोहोण्यासाठी गेल्याल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्देवालदेवी धरणात बुडून तरुणाच मृत्यूमित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडालामागील दोन महिन्यात वालदेवीतील दुसरी घटना

नाशिक : सिडकोतील पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहणाऱ्या कमलेश सोनवणे या तरुणाचा वालदेवी धरणात बुडून झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास घडली आहे.सिडकोतील पवननगर परिसतील  पाच ते सहा तरुण शुक्रवारी वालदेवी धरणात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणांनी वालदेवी धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर ते बाहेर आले. त्यावेळी त्यांचा मित्र कमलेश सोनवणे हा त्यांच्याबरोबर पाण्याबाहेर  आला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा गोधळ उडाला. सर्वांनी मिळून कमलेशची शोधाशोध सुरू केली. परंतु कमलेश कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याची शंका निर्माण झाल्याने स्थानिक गावकऱ्यांच्याही ही घटना निदर्शनास आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिस पथकासोबत कमलेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांच्या मदतीने कमलेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात वालदेवीत पोहोण्यासाठी गेल्याल्यांपैकी तरुण बुडाल्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी १६ एप्रिल रोजी वालदेवी धरणात सिडको परिसरातूनच पोहोण्यासाठी गेल्याल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  त्यानंतरही या भागात कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली नाही. त्यामुळे वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिसdrowningपाण्यात बुडणेDamधरण