शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

शंभरफुटी रस्त्याचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:39 AM

वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक-१ आदीमार्गे शंभरफुटी रस्ता तयार करण्यात आला. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. त्याची अखेर दोन महिन्यांपूर्वी महापा लिकेच्या अतिक्र मण विभागाने दखल घेत सुमारे साडेचारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. काही दिवसांतच या रस्त्याचे काम सुरू केले परंतु तेसुद्धा अर्धवट स्थितीत पडून आहे. दहा वर्षांपासून मनपाचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीसमोर असलेल्या शंभरफुटी रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत पडून आहे. कारण संबंधित मालकाकडून जमीन घेण्यास मनपा अद्याप असमर्थ ठरत आहे . त्यामुळे पन्नासफुटीच रस्ता तयार करण्यात आला आहे. उर्वरित पन्नासफुटी रस्ता तयार करण्यात न आल्याने संबंधित ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका