शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:45 IST

विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नाहीत

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरे हे बळ नसलेले नेते असल्यामुळे ते विरोधी पक्षनेते होणार नाहीत, त्यासाठी त्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून येण्याइतपत पक्षाची ताकद नसल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यात रिपाइंला सहा जागा देण्यात आल्या. एका जागेवर सेनेचा उमेदवार असून, पाच जागा रिपाइं लढत आहे. रिपाइंच्या सर्व उमेदवार कमळाचे चिन्ह घेऊन लढत असले तरी, विधिमंडळात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचेही आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा आठवले यांनी केला असून, आपल्या उमेदवारांनी कमळाचे निवडणूक चिन्ह घेतले म्हणून आपण भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षनेते पदासाठी जनतेकडे कौल मागितल्याच्या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी राज ठाकरे हे बळनसलेले नेते असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. त्यासाठीत्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असे सांगितले.पवारांवर गुन्हा चुकीचाचईडीने शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे चुकीचे असून, पवार हे कोणत्याही बॅँकेत संचालक नव्हते. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला असावा, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाworli-acवरळी