म्हसोबा यात्रेतून दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:58 PM2020-03-04T23:58:02+5:302020-03-04T23:58:23+5:30

नाशिकरोड : देवळालीगाव श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेत दोघा महिलांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

Two women stole Mangalsutra from Mhasoba Yatra | म्हसोबा यात्रेतून दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीस

म्हसोबा यात्रेतून दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीस

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : देवळालीगाव श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेत दोघा महिलांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
सामनगांवरोड अश्विनी कॉलनी येथील रेखा राजू बर्वे या मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दोन्ही मुली व वहिनींसह देवळालीगांव येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेस दर्शनासाठी व खरेदीसाठी आल्या होत्या. रात्री साडेनऊच्या समारास बांगड्या व कानातले खरेदी करत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे १८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अलगद काढून चोरून नेले. तसेच सुभाषरोड रेल्वे कॉलनी येथील संगीता राजेश बडगे या यात्रेत आल्या असता त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे १४ हजार ४०० रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two women stole Mangalsutra from Mhasoba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.