शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

By admin | Updated: January 10, 2015 00:47 IST

देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

नाशिकरोड : देवळालीगाव धनगर गल्ली येथे घरापुढे उभ्या केलेल्या दोन दुचाकी समाजकंटकाने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याने एक दुचाकी जळून खाक झाली, तर दुसऱ्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.देवळालीगाव धनगर गल्लीत राहणारे विशाल नारायण सांबरक्षत्रिय व त्यांचे कुटुंबीय राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी घरापुढे स्प्लेंडर प्लस (एमएच १५ सीयु १९१४) व कावासाकी बजाज (एमएच १५ व्ही २०३४) या दोन्ही गाड्या उभ्या केल्या होत्या. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास समाजकंटकांनी सांबरक्षत्रिय यांच्या घराला बाहेरून कडी लावून काहीतरी ज्वलनशील पदार्थ दोन्ही दुचाकीवर टाकून पेटवून दिले. धूर व वासामुळे आजूबाजूचे नागरिक जागे झाले त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र सांबरक्षत्रिय यांच्या घराला बाहेरून कडी लावल्याने ते बाहेर येऊ शकले नाही. आजूबाजूचे नागरिक आले व त्यांनी दरवाज्याला बाहेरून लावलेली कडी उघडली. तोपर्यंत स्प्लेंडर प्लस गाडी जळून खाक झाली होती. तर कावासाकी बजाज दुचाकीची आग विझविल्याने तिचे जास्त नुकसान झाले नाही. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनाची कायदा-सुव्यवस्थेवरील पकड ढिली होत चाललेली असून, जनतेशी झालेला दुरावा, कोम्बिंग आॅपरेशन बंद झाल्याने पुन्हा गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे १५-१६ तास उलटूनही याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. घटना कशी घडली याविषयी नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. (प्रतिनिधी)