वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:22 IST2022-02-21T01:22:08+5:302022-02-21T01:22:33+5:30

पांढुर्ली गावाकडून अंतर्गत रस्त्याने भगूरकडे जात असताना, दारणा पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार रोहिदास सुभाष माळी (४५, रा.साेयगाव, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला.

Two-wheeler killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : पांढुर्ली गावाकडून अंतर्गत रस्त्याने भगूरकडे जात असताना, दारणा पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार रोहिदास सुभाष माळी (४५, रा.साेयगाव, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला. रोहिदास हे शुक्रवारी (दि.१८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीने पांढुर्लीकडून भगूर दारणा पुलाकडे प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in vehicle collision