लखमापूर फाट्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 00:36 IST2022-02-22T00:36:10+5:302022-02-22T00:36:47+5:30
लखमापूर : लखमापूर फाटा येथे हॉटेल यश गार्डन समोर बस व दुचाकीचा अपघात होऊन लखमापूर येथील युवक जागीच ठार झाला.

भूषण धुळे
लखमापूर : लखमापूर फाटा येथे हॉटेल यश गार्डन समोर बस व दुचाकीचा अपघात होऊन लखमापूर येथील युवक जागीच ठार झाला.
सविस्तर माहिती अशी की, दिंडोरीकडून वणीकडे जाणारी आरामबस (एम एच -४७ वाय ६६५३) आणि समोरून येणारी मोटारसायकलची (एम एच १५ एच ई-६५०२) समोरासमोर धडक झाल्याने लखमापूर येथील युवक भूषण गोपीनाथ धुळे (वय २३) हा जागीच ठार झाला. त्यास खासगी वाहनाद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सर्वप्रथम अपघाताची माहिती मृत युवकाचे वडील यांना देण्यात आली. ते वणी येथे एका लग्न समारंभात होते. त्यांनी काही वेळात घटनास्थळी येऊन वणी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. पगार, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस सोनवणे, कमलेश देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी करून अपघाताची नोंद केली.