कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:27 IST2021-03-08T01:26:50+5:302021-03-08T01:27:36+5:30

भरधाव कंटेनरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. विजय अमरनाथ वर्मा (रा. रविशंकर मार्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Two-wheeler killed in container collision | कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. विजय अमरनाथ वर्मा (रा. रविशंकर मार्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल वर्मा याने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीवरून कंटेनर क्र. (एनएल ०१ एबी ०८१९) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास विजय वर्मा हे मोटरसायकलवरून घरी जात होते. यावेळी तपोवनकडून फेम सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर जनता शाळेसमोर भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या मोटरसायकलला कट मारला. 

Web Title: Two-wheeler killed in container collision