कारच्या धडकेत दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:12 IST2020-02-15T01:11:32+5:302020-02-15T01:12:42+5:30

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेदरम्यान एबीबी सर्कल सिग्नल ते बसस्टॉप दरम्यान घडली

Two-wheeler killed in car crash | कारच्या धडकेत दुचाकीचालक ठार

कारच्या धडकेत दुचाकीचालक ठार

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक ठार
झाल्याची घटना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेदरम्यान एबीबी सर्कल सिग्नल ते बसस्टॉप दरम्यान घडली असून, या अपघातात सातपूरच्या शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनीतील संदीप अभिमान जाधव (३८) यांचा मृत्यू झाला आहे, याप्रकरणी संतोष दगू शिंदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप जाधव हे दुचाकी (क्र. एमएच १५-जीसी-३९८३)वरून पती व मुलासह त्र्यंबकरोडने घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव कारने धडक दिली.

Web Title: Two-wheeler killed in car crash