ट्रकला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:04 IST2021-03-12T23:03:10+5:302021-03-12T23:04:39+5:30
लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.११) घडली.

ट्रकला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक : लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.११) घडली. या प्रकरणात दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेले हेमंतकुमार वेंकप्पा करकेरा (३९, रा. मृत्युंजय सोसायटी, विक्रोळी पूर्व) यांनी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले चालक नितीन मोहन मोरे (३९, रा. संजय गांधी स्मृती वसाहत, भोईवाडा, मुंबई) दुचाकी(एमएच ४८ एएन २८२६)वरून मंबईहून नाशिकला येत असताना लेखानगर परिसरात उड्डाणपुलावर ट्रक (एमएच०४, डीके २४०६) उभा असताना त्याला पाठीमागून धडकले. या अपघातात नितीन मोरे यांचा मृत्यू झाला, तर हेमंतकुमार वेंकप्पा करकेरा जखमी झाले आहेत.