भंगारच्या दुकानात कुरापत काढून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:14 IST2021-06-11T17:12:32+5:302021-06-11T17:14:10+5:30

नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरीरोडवरील दुकानात भंगार विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताने भंगार जास्त आहे असे म्हणून दुकानात काम करणाऱ्या दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण करून दुकानदाराच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.

The two were beaten up in a scrap shop | भंगारच्या दुकानात कुरापत काढून दोघांना मारहाण

भंगारच्या दुकानात कुरापत काढून दोघांना मारहाण

ठळक मुद्देभंगार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीने केली दुकानदाराला मारहाणदुकानात काम करणाऱ्या दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण

नाशिक : दिंडोरीरोडवरील दुकानात भंगार विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताने भंगार जास्त आहे असे म्हणून दुकानात काम करणाऱ्या दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण करून दुकानदाराच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.१०) दुपारच्या सुमाराला घडली आहे.

याबाबत सुभाष बालकिसन भारद्वाज यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाण प्रकरणी सोनू विष्णू गांगुर्डे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरीरोडवर भारद्वाज यांचे भंगार दुकान आहे. येते गांगुर्डे गुरुवारी दुपारी भंगार विक्रीसाठी त्याठिकाणी आला होता. तेव्हा त्याने भंगार जास्त आहे असे म्हणून दुकानात काम करणाऱ्या दीपक पवार व सचिन यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर दुकानदार भारद्वाज यांच्या डोक्यात काहीतरी लोखंडी वस्तू मारून दुखापत केली. याप्रकरणी सुभाष बालकिसन भारद्वाज यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सोनू गांगुर्डे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The two were beaten up in a scrap shop