शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार गृहनिर्माण संस्था धोक्यात

By admin | Updated: March 2, 2016 23:43 IST

दोन हजार गृहनिर्माण संस्था धोक्यात

 नाशिक : कागदोपत्री नोंदणी असलेल्या सहकारी संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करणाऱ्या सहकार खात्याने आता चक्क गृहनिर्माण सहकारी संस्थांना लक्ष्य केले असून, शहरातील १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांना लेखापरीक्षण केले नसल्याचे कारण देत नोेंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.यासंदर्भात तालुका उपनिबंधक फयाज मुलानी यांनी शहरातील १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांची यादी जाहीर केली असून, त्यांना ११ मार्च २०१६ पूर्वी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. मुळातच कोल्हापूर येथे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहनिर्माण सहकारी संस्था वगळता कागदोपत्री असलेल्या अन्य सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे जाहीर केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील जानेवारी महिन्यात गृहनिर्माण संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून तत्काळ लेखापरीक्षण करण्याचे व न केल्यास नोेंदणी रद्द करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र नंतर शासन स्तरावरून तोंडी आदेशानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांवरील कारवाई थांबली होती. मात्र आता पुन्हा सहकार खात्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांना लक्ष्य वेधून लेखापरीक्षण न केलेल्या १९६३ सालापासूनच्या शहरातील संस्थांची यादी जाहीर करीत त्यांना ११ मार्चपूर्वी म्हणणे मांडण्यासाठी लेखापरीक्षण न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील चार दशकांपासून वास्तव्य करणाऱ्या लाखो नाशिककरांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण या गृहनिर्माण सहकारी संस्थांची नोेंदणी रद्द झाल्यास या सहकारी सोसायट्यांचा वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या या कारवाईमुळे नाशिककरांची नेमकी भूमिका काय, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांनी या गंभीर विषयावर अद्याप मौन पाळल्याची चर्चा नोेंदणी धोक्यात आलेल्या या १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी)