गंगाघाटावर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:05 IST2018-11-18T17:05:02+5:302018-11-18T17:05:34+5:30

नाशिक : गंगाघाटावरील गौरी पटांगणावर शनिवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणा-या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ मंजित उर्फ लाल्या मनोज रॉय (१९, रा़अवधुतवाडी, सम्राटनगर, दिडोरी रोड) व विकी बाळू जाधव (१८, रा़वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिडोरी रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ त्यांच्याकडून चॉपर वा चाकू जप्त करण्यात आले असून पंचवटी पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Two suspects arrested for carrying arms on the Gangagatta | गंगाघाटावर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघा संशयितांना अटक

गंगाघाटावर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघा संशयितांना अटक

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : गंगाघाटावरील गौरी पटांगणावर शनिवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणा-या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ मंजित उर्फ लाल्या मनोज रॉय (१९, रा़अवधुतवाडी, सम्राटनगर, दिडोरी रोड) व विकी बाळू जाधव (१८, रा़वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिडोरी रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ त्यांच्याकडून चॉपर वा चाकू जप्त करण्यात आले असून पंचवटी पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

पंचवटीत तरुणाची आत्महत्या
नाशिक : घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन ३३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास पंचवटीतील क्रांतीनगरमध्ये घडली़ देवीदास दयाराम जडेजा (रा़वेडेबाबा मठासमोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

दुचाकीची चोरी
नाशिक : आडगाव परिसरातील कोणार्कनगरमधील रहिवासी नितीन नाईक यांची २० हजार रुपये किमतीची पॅशन प्लस दुचाकी (एमएच १४, अ‍ेके ६०६२) चोरट्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील शान कार समोरून चोरून नेली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सातपूरच्या जुगार अड्ड्यावर छापा
नाशिक : सातपूरच्या कांबळेवाडीतील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ संशयित सुनील गुलाबराव वाघ (४३, कांबळेवाडी, सातपूर) व त्याचा साथीदार जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Two suspects arrested for carrying arms on the Gangagatta