मालेगावी मोसम नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:52 AM2019-09-26T01:52:46+5:302019-09-26T01:53:11+5:30

तालुक्यातील खाकुर्डी येथे दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. विशाल भावडू सोनवणे (९) व दर्शन विजय देवरे (११) अशी मृतांची नावे  आहेत.

 Two students drowned in Malegavi Mosam River | मालेगावी मोसम नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

मालेगावी मोसम नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Next

वडनेर : तालुक्यातील खाकुर्डी येथे दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. विशाल भावडू सोनवणे (९) व दर्शन विजय देवरे (११) अशी मृतांची नावे  आहेत.
खाकुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विशाल सोनवणे व दर्शन देवरे हे दुपारी दीड वाजता मधल्या सुटीत घरी जेवण्यासाठी  गेले होते. दुपारनंतर सर्व  विद्यार्थी शाळेत आले. परंतु  विशाल आणि दर्शन दोघेही न परतल्याने शिक्षकांनी त्यांचा शोध घेतला.  मोसम नदीपात्रालगतच्या बंधाऱ्यानजीक एकाचा मृतदेह आढळून आला, तर
दुसरा विद्यार्थी गंभीर अवस्थेत आढळला. त्याला मालेगाव सामान्य रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Two students drowned in Malegavi Mosam River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.