जबरी लूट करणारे दोघे लुटारू ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:39 AM2021-10-16T01:39:35+5:302021-10-16T01:40:22+5:30

बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Two robbers arrested | जबरी लूट करणारे दोघे लुटारू ताब्यात

जबरी लूट करणारे दोघे लुटारू ताब्यात

Next

नाशिकरोड : बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या २७ सप्टेंबर रोजी विद्युत भवन येथे ठेकेदार अंकुश शिरसाठ व त्यांच्या वाहनचालकाला अज्ञात इसमांनी हॉकी स्टिक, लाकडी दांडुके बेदम मारहाण करून पाच लाखाची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी जबरी चोरी करून चोरून नेली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन करीत असताना गुन्ह्यातील आरोपी जत्रा हॉटेल येथे येणार असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेल जत्रा येथे सापळा रचून संशयित विशाल दिनकर बोबडे, (१९, रा. कोणार्कनगर, आडगाव) व आदित्य अशोक खलसे (१८, रा. इच्छामणीनगर, आडगाव) यांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा त्यांनी त्यांच्या इतर सात साथीदारांसह केल्याची कबुली दिली.

Web Title: Two robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app