घरासमोर लघुशंका केल्याच्या वादातून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 18:17 IST2018-09-17T18:17:08+5:302018-09-17T18:17:44+5:30

Two people have been assaulted by the dispute in front of the house | घरासमोर लघुशंका केल्याच्या वादातून दोघांना मारहाण

घरासमोर लघुशंका केल्याच्या वादातून दोघांना मारहाण

ठळक मुद्देलोखंडी पट्टीने मारहाण ; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : घरासमोर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने दोघा संशयितांनी दोन तरुणांना लोखंडी पट्टीने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१५) सायंकाळी अंबड गावाजवळील पडवळ मळ्याजवळ घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडवळ मळ्याजवळील वजन काट्याजवळ तुषार तडवी हा युवक राहतो़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तडवी हा मित्र धनेश वळवीसोबत उभा असताना संशयित पुंडलिक महादू गायकवाड व त्याचा मुलगा सचिन (रा. फडोळ मळा, अंबड) हे घरासमोर लघुशंका करीत होते. या दोघांना तडवी याने हटकल्याचा राग येऊ न गायकवाड व त्याच्या मुलाने लोखंडी पट्टीने जबर मारहाण करून दमदाटी केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two people have been assaulted by the dispute in front of the house