शहरातून दोन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:20 IST2018-08-22T14:19:45+5:302018-08-22T14:20:33+5:30
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

शहरातून दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
दिंडोरी नाक्यावरील आनंद प्रेम हाईट्समधील रहिवासी मंजुश्री राठी यांची २० हजार रुपये किमतीची प्लेजर दुचाकी (एमएच १७, एपी १८७४) चोरट्यांनी दिंडोरी रोडवरील सुयोग हॉस्पिटलजवळून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंजमाळ परिसरातील जगदेश्वर सोसायटीतील रहिवासी फरहान नूरआलम शेख यांची ४० हजार रुपये किमतीची पल्सर (एमएच १५, एझेड २९९) दुचाकी चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़