शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मूलभूत सुविधा उभारणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी

By admin | Updated: November 10, 2014 00:34 IST

मूलभूत सुविधा उभारणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने तपोवनात महापालिकेच्या ताब्यातील ५४ एकर जागेत साधुग्राम उभारणीसाठी सपाटीकरण, ड्रेनेजलाइन, अंतर्गत रस्ते, सेवा रस्ते आदि कामांना सुरुवात झाली असली, तरी साधुग्राममध्ये देण्यात येणाऱ्या शौचालय, स्नानगृह, पाणीपुरवठ्यासाठी स्टॅण्डपोस्ट्स यांसारख्या मूलभूत सुविधांना पालिकेच्या कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. सदर काम अहमदाबाद येथील ठेकेदाराला देण्यात आले असून, शौचालय-स्नानगृहांचे सॅम्पल्स तयार आहेत. या मूलभूत सुविधा उभारणीसाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध आखाड्यांचे, संप्रदायांचे साधू-महंत लाखोच्या संख्येने नाशिकला दाखल होत असतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था साधुग्राममध्ये केली जात असते. येत्या सिंहस्थात एकूण ३२३ एकर जागेवर साधुग्रामची उभारणी करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने आपल्या ताब्यातील ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारणीच्या दृष्टीने प्राथमिक कामांना सुरुवात केली आहे. त्यानुसार जागेचे सपाटीकरण सुरू असून, ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. अंतर्गत रस्ते, सेवा रस्त्यांचीही कामे सुरू आहेत; मात्र ही कामे संथ गतीने सुरू असल्याने पुढच्या कामांना विलंब होत आहे. साधुग्राममध्ये साधू-महंत यांच्यासाठी प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्लॉट्सवर संबंधित आखाड्यांनी आपल्या खर्चाने निवारा शेड्स उभे करायचे आहेत. परंतु शौचालय, स्नानगृह, पथदीप, पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन या मूलभूत सुविधा संबंधित खात्यांकडून पुरविल्या जाणार आहेत. शौचालय-स्नानगृह, स्टॅण्डपोस्ट्स या कामांचा ठेका अहमदाबाद येथील लल्लूजी अ‍ॅण्ड सन्स या कंपनीला देण्यात आला असून, ठेकेदाराकडून त्यासंबंधी सॅम्पल्सही तयार आहेत. त्यामध्ये महापालिकेने सीमेंटचे प्लींथ असलेल्या आणि फायबरचे भांडे असलेल्या शौचालय उभारणीला पसंती दिली आहे. साधुग्राममध्ये सुमारे ३६०० शौचालये व स्नानगृह उभारण्याचे नियोजन आहे; परंतु त्याबाबतचा अंतिम कार्यादेश ठेकेदाराच्या हाती नसल्याने काम रखडले आहे. सदर काम नोव्हेंबरमध्येच सुरू होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे; परंतु महापालिकेकडून त्यासंबंधी कसलीही हालचाल नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. साधुग्राममध्ये एका ब्लॉकमध्ये पत्र्याचे शेड उभारून आठ शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे, तर स्नानगृहात शॉवरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक स्नानगृहाबाहेर पिण्याच्या पाण्यासाठी स्टॅण्डपोस्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यातून सुमारे दीडशे ते दोनशे मजुरांना रोजगार मिळणार आहे. मूलभूत सुविधांच्या कामांना विलंब झाल्यास पुढील कामेही रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम नियोजनावर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)