लहवितमध्ये दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:07 IST2018-09-07T16:07:28+5:302018-09-07T16:07:51+5:30
नाशिक : घराच्या बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लहवितमधील पंचशीलनगरमध्ये घडली आहे़

लहवितमध्ये दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : घराच्या बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लहवितमधील पंचशीलनगरमध्ये घडली आहे़
पंचशीलनगरमधील धृपदा कांबळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २६ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़ तसेच बेडरुममध्ये ठेवलेल्या कपाटाच्या लॉकरमधून ४५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, ४५ हजार रुपयांचे ७ ग्रॅम ५९० मिली सोन्याचे दोन लॉकेट, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची दहा ग्रॅम वजनाची मोहनमाळ, ३० हजार रुपयांचे कानातील झुंबर व त्यांच्या पुतणीचे बॅगमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपयांची सोन्याची गठण पोत असा एक लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.