शहरातील विविध अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:12 IST2018-11-27T01:12:10+5:302018-11-27T01:12:24+5:30

शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२५) घडली़ पेठरोड व सिन्नर फाटा या दोन परिसरात हे अपघात झाले असून, त्यामध्ये तरुण व तीनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, या अपघातांची म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

 Two killed in various road accidents in the city | शहरातील विविध अपघातांत दोन ठार

शहरातील विविध अपघातांत दोन ठार

नाशिक : शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२५) घडली़ पेठरोड व सिन्नर फाटा या दोन परिसरात हे अपघात झाले असून, त्यामध्ये तरुण व तीनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, या अपघातांची म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ रोडवरील राऊ हॉटेलसमोरील सिग्नलवरून रविवारी (दि. २५) रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास नीलेश दौलत जगताप व त्याचा मित्र विकास गणेश कुवर हे दुचाकीवरून (एमएच १५, सीके २१०५) नाशिककडे येत होते. यावेळी म्हसरूळकडून भरधाव आलेल्या आयशर ट्रकवर त्यांची दुचाकी आदळून अपघात झाला़ यामध्ये डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नीलेश जगताप या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विकास कुंवर हा गंभीर जखमी झाला आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आयशर ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची दुसरी घटना सिन्नर फाटा परिसरात रविवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास घडली.

Web Title:  Two killed in various road accidents in the city