लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : चंदनपुरी शिवारात महामार्गावर व नामपूर- मालेगाव रस्त्यावर काष्टी फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काष्टीफाटा येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर उभा असताना त्यावर दुचाकी जाऊन आदळल्याने इम्तियाज अहमद मोहंमद आमीन (४०) रा. नयापुरा हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. बक्तीयार अहमद मोयोउद्दीन (३५) रा. रमजानपुरा हा जखमी झाला. इम्तियाज अहमदच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भावंडे असा परिवार आहे. दुसरा अपघात चंदनपुरी शिवारात झाला. मनमाड चौफुली येथे शेख सगीर शेख नूर (४०) रा. रोशनाबाद व गयासुउद्दीन बाबुशेठ सय्यद हे दोघे पाटणा येथे उरुसानिमित्त जात असताना नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एम.एच.१९. झेड.४५७०) चुकीच्या दिशेने येऊन दुचाकी (क्रमांक एम.एच.४१. ए. ई- ८९०४) वर येऊन धडकल्याने पलटी झाली. यात गयासुउद्दीन सय्यद जागीच ठार झाले तर शेख सगीर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालेगावी दोन अपघातात दोन ठार; दोन जखमी
By admin | Updated: May 8, 2017 00:39 IST