नाशकात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये लाखोंच्या दागिन्यांसह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:04 IST2018-11-02T16:00:51+5:302018-11-02T16:04:17+5:30
खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या दुसºया घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या प्रकरणात अंबड व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशकात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये लाखोंच्या दागिन्यांसह रोकड लंपास
नाशिक : खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या दुसºया घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या प्रकरणात अंबड व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खुटवडनगर येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी बुधवारी (दि. ३१) अमित वसंतराव पवार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दोन तोळे सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, सोन्याचा हार, कर्णफुलांचा सेट, १५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बारा बांगड्या, एक तोळे वजनाचा सोन्याचा हार, स्क्रू लॉकिंग सोन्याची बांगडी, आठ तोळे वजनाच्या चार चेन, दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याचा शिक्का असे एक लाख दहा हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून लांबविले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत. तर दिंडोरी रोड परिसरातील लक्ष्मी कार मॉलसमोरील सिद्धांत प्लाझा अपार्टमेंटमध्ये दोन नंबरचे दुकान फोडून ८३ हजार रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद लामखेडे मळ््यातील पुष्पविजय अपार्टमेंटमधील श्रद्धा वैभव मुळे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित अनिता मराठे व रावसाहेब भोसले यांनी दि. ३० व ३१ आॅक्टोबर रोजी मुळे यांच्या सिद्धांत प्लाझामधील अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या दुकानाचे शटरचे बनावट चावीने खोलून त्यातील ८३ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहोकले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.