पिंपळस(रामाचे)येथील अपघातात औरंगाबादचे दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 15:50 IST2019-08-25T15:49:43+5:302019-08-25T15:50:09+5:30
निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे एका कारचे टायर फुटून कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात औरंगाबाद येथील दोघेजण जखमी झाले आहेत.

निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे अपघातग्रस्त झालेली कार.
चांदोरी(जि. नाशिक): निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे एका कारचे टायर फुटून कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात औरंगाबाद येथील दोघेजण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद येथील नीलेश सुभाष कुलकर्णी हे आपल्या परिवारासोबत इको स्पोर्ट कारने (क्रमांक एमएच२०ईई ६१७५)ने नाशिककडे जात असताना पिंपळस रामाचे गावानजीक असलेल्या वळणावर गाडीचे टायर फुटल्या. यामुळे गाडी थेट पुलावरून खाली कोसळली.
या अपघातात माधुरी कुलकर्णी (६५) व इशांत कुलकर्णी (९) हे जखमी झाले. त्यांना स्थानिका नागरिकांनी पुढील उपचाराकरिता नाशिक येथे हलविले.