मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:03 PM2023-10-07T14:03:30+5:302023-10-07T14:05:15+5:30

जवान सिनेमाचा शो सुरू असताना मालेगाव शहरातील कमलदीप थेअटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी अतिउत्साह दाखवला.

Twine bomb exploded in Malegaon when Jawan's show was on, panic in the theater | मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

googlenewsNext

नाशिक - बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचाजवान चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक महिना झाला. मात्र, अद्यापही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला गर्दी दिसून येत आहे. शाहरुखचे चाहते सिनेमागृहात जाऊन जवान पाहत आहेत. विशेष म्हणजे कुणी शाहरुखचा लूक मेकओव्हर करताना पाहायला मिळतो, तर कुठे सिनेमागृहाबाहेर शाहरुखचा मोठा डिजिटल दिसून येतो. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शाहरुखच्या चाहत्यांनी चक्क सिनेमागृहातच सुतळी बॉम्ब फोडून जल्लोष साजरा केला. त्यामुळे, चित्रपटगृहातील प्रेक्षकांमध्ये भीती पसरली होती. 

जवान सिनेमाचा शो सुरू असताना मालेगाव शहरातील कमलदीप थेअटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी अतिउत्साह दाखवला. त्यामुळे, पोलिसांनी थेअटरमध्ये धाव घेतली होती. सिनेमा पाहायला आलेल्या काही चाहत्यांनी जवान चित्रपटातील गाणं सुरू असताना थेअटरमध्येच सुतळी बॉम्ब फोडले. त्यामुळे, काही काळ बॉम्ब फुटल्याची अफवाही पसरली होती. तर, सिनेमाचा शो ही बंद करण्यात आला होता. मात्र, ते सुतळी बॉम्ब असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र, या घटनेतील आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.   

सिनेमागृहात किंवा सार्वजनिक ठिकाणी ज्वलनशील पदार्थ तसंच फटाक्यांसारख्या पदार्थांना बंदी आहे. तरीही, येथील सिनेमागृहात जवान सिनेमा पाहताना सुतळी बॉम्ब उडवून भीतीचे वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याने आणि नियमांचे पालन न केल्याने अतिउत्साही चाहत्यांना पोलिसांनी इंगा दाखवला. दरम्यान, याप्रकरणी मालेगाव शहरातील रमजान पुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही करण्याचं काम सुरू आहे.
 

Web Title: Twine bomb exploded in Malegaon when Jawan's show was on, panic in the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.