शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनचे घसरले सव्वीस डबे

By admin | Updated: December 31, 2016 22:50 IST

वाताहत : विकासाची राजमात्रा ठरली कुचकामी; सत्तापद कायम राखण्याचे आव्हान

धनंजय वाखारे : नाशिक
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चाळीस नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचवार्षिक काळात आधी भाजपाच्या नंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कुबड्या घेऊन कसाबसा संसार केला. कधी प्रशासकीय तर कधी राजकीय कारणांमुळे राज ठाकरे यांनी दाखविलेल्या विकासाची मात्रा काही चालली नाही आणि रुळावर प्रथमच चढलेल्या इंजिनचे तब्बल सव्वीस डबे घसरले. सत्ताधारी असूनही पक्षाची वाताहत होण्याचे दुर्भाग्य मनसेच्या वाट्याला आले.
सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत फार्मात असलेल्या मनसेच्या राज करिश्म्यावर चाळीस जण स्वार होत निवडून आले आणि सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या मनसेने भाजपाच्या साथीने सत्तापद हस्तगत केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे पहिले महापौर म्हणून अ‍ॅड. यतिन वाघ यांना बहुमान प्राप्त झाला, तर उपमहापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी यांची वर्णी लागली. मात्र, महत्त्वाची अर्थवाहिनी मानली जाणारी स्थायी समिती कॉँग्रेसचे उद्धव निमसे यांच्या हाती गेल्याने मनसे-भाजपाची कोंडी झाली. कधी पूर्णवेळ आयुक्तच नाही तर कधी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पांना मिळणाऱ्या स्थगित्या यामुळे कामकाज करणे अवघड होऊन बसल्याची कबुली खुद्द राज यांना द्यावी लागली आणि इच्छा असूनही विकासाची वाट धरता येत नसल्याचे सांगत शासनावर खापर फोडत राहिले.
मित्र पक्ष भाजपातही कामे होत नसल्याने असंतोष पसरला आणि भाजपा मनसेपासून अलग झाला. पुढच्या अडीच वर्षांत दुसऱ्यांदा महापौर निवडीची वेळ येऊन ठेपली त्यावेळी राजकीय समीकरणे बदलली.