बारा टायर ट्रकची दुचाकीला धडक महीला जागीच ठार तर दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:27 IST2021-03-25T19:27:42+5:302021-03-25T19:27:42+5:30
वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.

बारा टायर ट्रकची दुचाकीला धडक महीला जागीच ठार तर दोघे गंभीर
वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.
याबाबत माहीती अशी गुरुवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास वणी ग्रामसचिवालयालगत असलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रस्त्यावरुन दिलीप काशीनाथ पाडवी (६०) राहणार शिवलपाडा भनवड, जिजाबाई दिलीप पाडवी (५०) व विठ्ठल तुळशीराम गायकवाड (७०) राहणार अंबाड (भनवड) असे तिघे दुचाकीवरुन वणी सापुतारा रस्त्यावरुन दुपारच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात आलेल्या बारा टायर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महीला काही फुटावर पडल्याने जबर मार लागल्याने जिजाबाई पाडवी या जागीच ठार झाल्या. तर दिलीप पाडवी व विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर भरधाव ट्रकचालक पसार झाला. त्याचा पोलीसांनी पाठलाग केला. माळे फाट्याजवळ हा ट्रक पकडण्यात आला. पोलीसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले.