तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:02 IST2021-01-27T19:00:00+5:302021-01-27T19:02:23+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त कुस्तीगीर तुलसी पाथरे हिला ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण बाळासाहेब जाधव यांनी दिला. यावेळी नानासाहेब बोरस्ते, रवींद्र मोरे, ए. जे. मोरे, मुख्याध्यापिका मीना आहेर आदी उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले.
तुलसी हिने महाराष्ट्र राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत प्राविण्य मिळवले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन तुलसीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, संचालक व माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, प्रा. रवींद मोरे, सोमनाथ मोरे, बाळासाहेब बनकर, क्रीडाशिक्षक सुनीता जाधव, मुख्याध्यापक ए. जे. मोरे, मीना आहेर, एन. सी. सी. अधिकारी नितीन डोखळ, रामराव बनकर आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, कार्याध्यक्ष दिनकर पाटील, सचिव उत्तम दळवी, उपाध्यक्ष वाळू नवले, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य प्रा. रवींद्र मोरे यांचे मार्गदर्शन तुलसीला मिळाले.