नाशिकरोड : चेहेडीशिव येथे शुक्रवारी दुपारी मोटार- सायकलला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आशुतोष उबाळे हा युवक ठार झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. आशुतोष हा शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार अनिल उबाळे यांचा मुलगा होता. आशुतोष अनिल उबाळे (१९) व स्वप्नील सुरेश गडाख (२१) हे दोघे युवक पल्सर मोटारसायकल (एमएच १५ ईवाय ०५९७) वरून शुक्रवारी दुपारी चेहेडीशिव येथे मित्राच्या घरी तीर्थप्रसाद घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जुन्या चेहेडी शिवजवळ (एमएच १२ एफझेड-९१५७) ट्रकने धडक दिल्याने उबाळे व गडाख हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उबाळे यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}