उड्डाणपुलावर चढताना आॅइलचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:48 IST2019-06-14T01:48:13+5:302019-06-14T01:48:30+5:30
मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू ट्रक भुजबळ फार्म येथे उड्डाणपुलावरून खाली उतरला आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढताना महामार्गावर उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली

उड्डाणपुलावर चढताना आॅइलचा ट्रक उलटला
नाशिक : मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू ट्रक भुजबळ फार्म येथे उड्डाणपुलावरून खाली उतरला आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढताना महामार्गावर उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास मुंबईकडून आॅइलचे ड्रम घेऊन निघालेला ट्रक (एमपी ०७, एचबी ८१४२) गोविंदनगरजवळ येऊन उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा चढताना खाली कोसळला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सकाळी नऊ वाजेपर्यंत ठप्प झाली होती.