शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 23:36 IST

टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

नाशिकरोड : चांडक-बिटको महाविद्यालयात सध्या विविध ‘डे’ साजरे केले जात असून, त्यामुळे महाविद्यालय परिसरात व जलतरण तलाव येथे टवाळखोर टोळक्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील रहिवासी, व्यावसायिक, विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी दुचाकी राइडिंग करणारे, छेडछाड बहाद्दरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. चांडक-बिटको महाविद्यालयात सध्या विविध ‘डे’ साजरे केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व महाविद्यालयात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र ज्यांचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नाही अशा युवक, टवाळखोरांचीदेखील महाविद्यालयाच्या परिसरात गर्दी झालेली असते. महाविद्यालयाच्या शेजारी दोन-तीन शाळा असून, शाळेतील लहान विद्यार्थी, पालक रस्त्याने येत-जात असतात. महाविद्यालयाच्या पाठीमागे जलतरण तलाव येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात युवक, टवाळखोर उभे असतात. वाहनांची राईडिंग करणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, शिट्ट्या, शिवीगाळ, आरडाओरड यामुळे परिसरातील रहिवासी, व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. महाविद्यालयामागील काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल याठिकाणी टवाळखोर युवकांकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत. सर्व ‘धांगडधिंगा’ बघून शाळेतील मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. त्या ठिकाणी विद्यार्थिनी, युवती उभ्या राहात असल्याने टवाळखोरांना आणखी ‘ऊतमात’ येतो. पोलीस आल्यावर पळून जाणारे युवक पुन्हा काही वेळातच तेथे जमतात. पोलिसांनी टवाळखोरांना वठणीवर आणण्याची मागणी परिसरातील महिला, रहिवासी, पालक, व्यावसायिकांनी केली आहे.