भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा, ट्रस्टकडून मात्र समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 23:41 IST2026-03-03T23:40:05+5:302026-03-03T23:41:11+5:30

त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला बेदम मारहाण झाली होती.

Trimbakeshwar Temple Guards Face Legal Heat for Misbehaving with Devotee | भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा, ट्रस्टकडून मात्र समर्थन

भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा, ट्रस्टकडून मात्र समर्थन

त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात रविवारी (दि.१) एका भाविकाला सुरक्षारक्षकांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुरक्षारक्षकांकडून भाविकांशी होणाऱ्या गैरवर्तनाचे प्रकार यापूर्वीही घडले असल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टने मात्र, सदर भाविकानेच अगोदर सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालत मारहाण केल्याचा दावा केला असून तसे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. रविवारी (दि.१) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एका भाविक गर्भगृहाजवळ दर्शनासाठी आला असता त्याचा तेथील नियुक्त सुरक्षारक्षकाशी वाद झाला. यावेळी सदर सुरक्षारक्षकाने त्याला ढकलले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी अन्य सुरक्षारक्षकांनी एकत्र येत सदर भाविकाला चोप देत बाहेर काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर देवस्थानमधील सुरक्षारक्षकांचा गैरवर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देवस्थान ट्रस्टमधील सुरक्षारक्षकांच्या मुजोरपणाच्या घटना यापूर्वीही घडलेल्या घडलेल्या असून त्याविरोधात भाविकांनी वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. परंतु देवस्थान ट्रस्ट त्यांना वारंवार पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

अखेर गुन्हा दाखल

पोलिस शिपाई अमोल बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरक्षारक्षक पप्पू नानाजी आचारी व तुकाराम उमेश बुरूंगे रा. त्र्यंबकेश्वर यांच्यासह अन्य तीन ते चार सुरक्षारक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वतःहून घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

सदर भाविक हा नशेत असावा, असे त्याच्या वागण्यावरून दिसत होते. त्याने देवस्थानच्या कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत केली आहे. या घटनेची सर्व नोंद देवस्थानच्या डायरीत करण्यात आली असून, आम्ही पोलिसांना पाचारण केले होते. भाविकांनी नंतर आपली चूक मान्य करून माफीही मागितली आहे. कैलास घुले, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

Web Title : त्र्यंबकेश्वर: भक्त से मारपीट करने पर सुरक्षाकर्मियों पर मामला, ट्रस्ट का बचाव

Web Summary : त्र्यंबकेश्वर मंदिर में एक भक्त के साथ कथित तौर पर सुरक्षाकर्मियों ने मारपीट की। पुलिस ने गार्डों के खिलाफ मामला दर्ज किया। मंदिर ट्रस्ट का दावा है कि भक्त ने ही झगड़ा शुरू किया और अपने दावे के समर्थन में सीसीटीवी फुटेज जारी किया, जिसमें भक्त नशे में बताया गया है।

Web Title : Trimbakeshwar: Case Filed Against Guards for Assaulting Devotee, Trust Defends Action

Web Summary : A devotee was allegedly assaulted by security at Trimbakeshwar temple. Police filed a case against the guards. The temple trust claims the devotee instigated the altercation and released CCTV footage to support their claim, alleging the devotee was drunk.