त्र्यंबक पंचायत समितीच्या जीपला अपघात; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:42 IST2021-06-15T22:51:52+5:302021-06-16T00:42:38+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपची व दुचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trimbak Panchayat Samiti's jeep accident; Young man killed | त्र्यंबक पंचायत समितीच्या जीपला अपघात; युवक ठार

त्र्यंबक पंचायत समितीच्या जीपला अपघात; युवक ठार

ठळक मुद्देजीपचालक संजय विठोबा गुंड हे स्वतःहून हरसूल पोलीस ठाण्यात दाखल

त्र्यंबकेश्वर : येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपची व दुचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सरकारी जीप (क्रमांक एम एच १५ ए ए ५०२१) हरसूल येथून त्र्यंबककडे येत असताना चिंचवड-हरसूल रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ समोरुन भरधाव येणारी दुचाकी (क्रमांक एम एच १५ डी एच ४८८०) ही जीपला धडकली. त्यात दुचाकीवरील जगदीश लक्ष्मण कनोजे (२४) रा. सापत पाली हा गंभीर जखमी झाला. त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद विलास लक्ष्मण जाधव (सापतपाली) यांनी हरसूल पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१४) दाखल केली आहे.
सदर अपघात शुक्रवारी (दि.११) सायंकाळी साडेसहा वाजता घडला. दरम्यान चौकशी केली असता सरकारी जीप मध्ये स्वतः गटविकास अधिकारी किरण जाधव, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, जि. प. चे कृषी अधिकारी विटनोर व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड आदी सरकारी कामांना भेटी देण्यासाठी आले होते. परदेशी हे पेठहून हरसूल येथे गटविकास अधिकारी यांना भेटले. हे सर्व अधिकारी नाशिक येथे चालले होते. जीपचालक संजय विठोबा गुंड हे स्वतःहून हरसूल पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

 

Web Title: Trimbak Panchayat Samiti's jeep accident; Young man killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.