शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:20 PM

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.गावठा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकांना बिबट्याचे बछड्यासह दर्शन होत आहे. गेल्या दोन दिवसांत बिबट्याने झापावरील कुत्रे, कोंबडया फस्त केल्या आहेत. गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ परिसरात झापावर वास्तव्यात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जनावरे, कोंबड्या, कुत्रे यांच्या संरक्षणासाठी झापाच्या बाहेर झोपलेले लहारे यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. कडाक्याची थंडी असल्याने लहारे यांनी दोन-तीन गोधड्या अंगावर पांघरून घेतल्या होत्या. बिबट्याने गोधडीवर हल्ला चढवीत पलायन केल्याने लहारे यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे रात्रीच्या सुमारास ये-जा करणाºया वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झापावरील जनावरे, शेळ्याच्या संरक्षणासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश लहारे, बुधा लहारे, लक्ष्मण लहारे, केशव लहारे, नामदेव आंबेकर, विलास लहारे, दौलत जाधव, पुंडलिक लहारे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या