आदिवासी युवकांनी वाचवले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:56 IST2019-03-12T17:52:14+5:302019-03-12T17:56:34+5:30
पिंपळगाव बसवंत : शिरसगाव हद्दीतील चंबळखोरे येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराला औषधोपचार करून जीवदान दिले.

आदिवासी युवकांनी वाचवले मोराचे प्राण
पिंपळगाव बसवंत : शिरसगाव हद्दीतील चंबळखोरे येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराला औषधोपचार करून जीवदान दिले.
दिक्षी हद्दीतील समूह करून राहत असलेल्या आदिवासी युवकांना अस्वस्थ अवस्थेत मोर पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्परतेने पिंपळगाव बसवंत येथील पशु अधिकारी अल्केश चौधरी व पक्षी मित्र यांच्याशी संपर्क केला. पशु मित्र व डॉक्टर यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना माहिती दिली. आणि दिक्षी शिवारातील चंबलखोरे वस्तीत पशु अधिकारी अल्केश चौधरी, डॉ.संजय कंडळ, डॉ. परिचर शेजवळ, निलेश गाईखे व मानवाधिकार तालुका अध्यक्ष योगेश विधाते आदी घटनास्थळी पोहचले व त्या मोरांचा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अल्केश चौधरी यांनी उपचार करून त्याला सोडून दिले.
वाढत्या उन्हामुळे पशु, पक्षी अस्वस्थ होत असतात हा मोर देखील उन्हामुळेच अस्वस्थ झाला असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. माणुसकीच्या भावनेने या मोराला येथील आदिवासी युवकांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट....
च्वाढत्या उन्हामुळे पक्षाचे जीवन धोक्यात ...
च्पाणी टंचाईचा पक्षांवरही परिणाम...
च्घरासमोर, अंगणात, छतावर पक्षी, प्राण्यांकरीता प्रत्येकाने पाण्याची सोय केली पाहिजे.
च्पाण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मोहिम मनापासून प्रत्येकाने राबविली पाहिजे.
(फोटो १२ पिंपळगाव मोर)