नाशिक : शहरातील मुसळधार पावसामुळे विविध भागात पाण्याचे तळे साचले असून कॉलेजरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात व अहल्यादेवी मार्गावर लव्हाटेनगर परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर काहीप्रमाणात ओसरल्याने उंटवाडी भागातील वाहतूक सुरळीत झाली असली तरी, कालेडरोडवरून एकतर्फाच वाहतूक सुरू होती. कॉलेजरोडवरील बीवायके महाविद्यालायच्या वाहतळात वाळलेले झाड पावसामुळे कोसळले. सुदैवाने रविवारच्या सुट्टीमुळे याठिकाणी कोणीही नसल्याने या घटनेत कोणत्याही प्र्रकारची जिवित हानी झाली नाही. मात्र कोसळून पडलेल्या झाडाचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे तसेच रस्यावर दोन फुटांहून अधिक पाणी पाणी वाहत असल्याने या भागातील वाहतूक बंद करण्याच आली होती. दुपारनंतर पावासाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाल्याने कॉलेजरोडची एकाबाजू येणाऱ्या- जाणाऱ्या वाहणांसाठी खुली करण्यात आली. तर नाशिक शहरातून सीडकोकडे जाणाऱ्या मार्गावर उंटवाडी सिग्नलवर पाण्याचे तळे साचल्याने या भागात दुपारी बारा वाजेच्यासुमारास वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. या सिग्नलकडून लव्हाटेनगरच्या दिशेन जाणाऱ्या पुण्यश्लोक अहल्यादेवी मार्गावरील दुभाजकावर असलेले झाड कोसळले. महापालिके च्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हे झाड हटविण्याचे काम केले. या कालावधीत पावसाचा जोर काही प्रमाणात ओसलल्याने उंटवाडी सिग्नल चौकात साचलेले पाणी काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
बीवायकेच्या वाहनतळावर झाड कोसळले ; रविवारच्या सुट्टीमुळे जीवीत हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:37 IST
नाशिक शहरातील मुसळधार पावसामुळे विविध भागात पाण्याचे तळे साचले असून कॉलेजरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात व अहल्यादेवी मार्गावर लव्हाटेनगर परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर काहीप्रमाणात ओसरल्याने उंटवाडी भागातील वाहतूक सुरळीत झाली असली तरी, कालेडरोडवरून एकतर्फाच वाहतूक सुरू होती.
बीवायकेच्या वाहनतळावर झाड कोसळले ; रविवारच्या सुट्टीमुळे जीवीत हानी टळली
ठळक मुद्देबीवायके महाविद्यलयाच्या वाहनतळात झाड कोसळले.कॉलेजरोडवर पाणी साचल्याने वाहतूक बंद