आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा; पती-पत्नीने चिठ्ठी लिहिली अन्...; सर्वांचेच डोळे पाणावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 21:11 IST2024-12-23T20:39:25+5:302024-12-23T21:11:07+5:30
कुटुंबीयांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या.

आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा; पती-पत्नीने चिठ्ठी लिहिली अन्...; सर्वांचेच डोळे पाणावले!
Sinnar Crime: सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथील दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी मुलीच्या मामा आणि मावशी यांना उद्देशून 'आमच्या पाच वर्षांच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा' अशा आशयाच्या लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकुराने सर्वांचेच डोळे पाणावले.
ज्ञानेश्वर अशोक बोराडे (३५) व दीपाली ज्ञानेश्वर बोराडे (३०) अशी मृतांची नावे आहेत. ते शेतीसह दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना पाच वर्षांची आराध्या नावाची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडले. रविवारी (दि.२२) सकाळी ज्ञानेश्वर यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. कुटुंबीयांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या.
मामा-मावशीच्या नावाने चिठ्ठी लिहिली अन्...
वावी पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता दोन तासांनंतर विहिरीच्या तळाला दोघांचे मृतदेह मिळून आले. शनिवारी (दि.२१) आर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी मुलीच्या मामा व मावशींना उद्देशून माफ करा, आमच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा, आमच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करा असे लिहिले आहे. या मजकुराने अनेकांचे डोळे पाणावले.