गांधीनगर मैदानाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:30+5:302020-12-04T04:38:30+5:30

सर्व्हीसरोडवरील थांब्यामुळे कोंडी नाशिक : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामंडळाच्या बसेसेला आता सर्व्हिसरोडवर हॉटेल द्वारका येथे थांबा देण्यात ...

Transformation of Gandhinagar ground | गांधीनगर मैदानाचा कायापालट

गांधीनगर मैदानाचा कायापालट

सर्व्हीसरोडवरील थांब्यामुळे कोंडी

नाशिक : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामंडळाच्या बसेसेला आता सर्व्हिसरोडवर हॉटेल द्वारका येथे थांबा देण्यात आलेला आहे. मात्र आता या ठिकाणी रिक्षाचालकासह अनधिकृतपणे उभे राहत असल्याने बसचालकांना नाईलाजाने रस्त्यात बस थांबवावी लागत आहे. त्यामुळे पाठीमागू येणाऱ्या वाहनांची रांग लागते, तर पुढेच सिग्नल असल्यामुळे तेथेही वाहने उभी असतात. त्यामुळे या मार्गावर सतत कोंडी होते.

वाहतूक पोलिसांचे सिग्नलकडे दुर्लक्ष

नाशिक : द्वारका चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानंतर वाहतूक पोलीस निर्धास्त झाल्याचे दिसत आहे. चौकात पोलीस उभे असले तरी वाहनधारक सिग्नल नियमांचा भंग करून वाहने चालवित असल्याने अनेकदा चौकातच वाहतूक कोंडी होते. पोलिसांसमोरच कोंडी होत असताना पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. सिग्नलचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरच पोलीस चौकात येतात असा अनुभव वाहनधारकांना येत आहे.

Web Title: Transformation of Gandhinagar ground