शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

तीन गट विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 7:45 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते.

ठळक मुद्देपिंगळे सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखपदीअतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद गेल्या महिन्यापासून रिक्त

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : ग्राम विकास विभागाने राज्यातील दहा गट विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात मालेगावचे गट विकास अधिकारी आनंद पिंगळे यांची जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली तर चांदवड व देवळा या दोन्ही पंचायत समितीच्या गट विकास अधिका-यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. शासनाने आता या पदावर मालेगावचे गट विकास अधिकारी आनंद पिंगळे यांची नेमणूक केली आहे. पिंगळे यांनी यापुर्वीही जिल्ह्यात काम केलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागाची चांगली माहिती व प्रश्नांची जाण आहे. त्याच बरोबर विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त असलेले आर. ए. देशमुख यांची देवळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणून तर देवळ्याचे गट विकास अधिकारी एम. यू. पाटील यांची चांदवड पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद गेल्या महिन्यापासून रिक्त असून, सध्या या पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उज्वला बावके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी या पदावर अधिका-यांची नियुक्ती होण्याची अपेक्षा होती परंतु त्याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी आनंद पिंगळे यांनी आपला पदभार स्विकारला तत्पुर्वी जिल्हा परिषदेतून नाशिक महापालिकेत बदली झालेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी प्रदीप चौधरी यांना जिल्हा परिषदेकडून निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद