लोहोणेर गावातील व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 00:05 IST2022-02-15T00:03:41+5:302022-02-15T00:05:05+5:30

लोहोणेर : दोन दिवसांपूर्वी गावातील गोरख बच्छाव या युवकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर गोरखचा रविवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या निधनाची वार्ता गावात पसरताच बच्छाव कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली.

Transactions in Lohoner village closed | लोहोणेर गावातील व्यवहार बंद

लोहोणेर गावात व्यापाऱ्यांनी पाळलेला बंद.pol

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोहोणेर : दोन दिवसांपूर्वी गावातील गोरख बच्छाव या युवकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर गोरखचा रविवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या निधनाची वार्ता गावात पसरताच बच्छाव कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली.
यावेळी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस उपअधीक्षक माधुरी कागणे, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे हे सकाळपासून नियंत्रण ठेवून होते. दुपारी १:३० वाजता वातावरणात गोरख बच्छाव यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात गिरणा काठी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा मोठा भाऊ बाबाजी याने आपल्या लहान भावाला अग्नी डाग दिला. गोरख याच्या पश्चात आई कस्तुराबाई, भाऊ बाबाजी व संदीप असा परिवार आहे. गोरख बच्छाव याच्या अंत्यविधी प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

Web Title: Transactions in Lohoner village closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.