पंजाब मेलसह मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रखडल्या; इगतपुरी येथे ओव्हरहेड केबल तुटल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:41 IST2025-06-13T15:38:29+5:302025-06-13T15:41:25+5:30

विलास भालेराव, नाशिक : भगूर-कँम्प डबल चौकी रेल्वेच्या गेटलगत पंजाब मेल रेल्वेगाडी आज अचानक पहाटे चार वाजेपासून थांबली. त्यामुळे ...

Trains heading towards Mumbai including Punjab Mail delayed; Overhead cable break at Igatpuri | पंजाब मेलसह मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रखडल्या; इगतपुरी येथे ओव्हरहेड केबल तुटल्याचा परिणाम

पंजाब मेलसह मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रखडल्या; इगतपुरी येथे ओव्हरहेड केबल तुटल्याचा परिणाम

विलास भालेराव, नाशिक: भगूर-कँम्प डबल चौकी रेल्वेच्या गेटलगत पंजाब मेल रेल्वेगाडी आज अचानक पहाटे चार वाजेपासून थांबली. त्यामुळे रेल्वे गेट बंद असल्याने नाशिक भगूर लहवित येथे रेल्वे गेट मधून जाणारी वाहतूक ठप्प झाली. ती भगूर शहर पांढुर्ली मार्गे वळविण्यात आली. एकंदरीत चार तासांपर्यंत रेल्वे प्रवासी परिसरात डब्यात थांबून राहिले.

दरम्यान, यासंदर्भात दोन लोको पायलट यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, रात्रीच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे इगतपुरी सेक्शनची हायटेन्सशन वायरहेड तुटली. त्यामुळे फक्त मंगला एक्स्प्रेस गेली. त्यानंतर हा प्रसंग घडला, तरी तुटलेली वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे उशीरा धावणार आहे.

Web Title: Trains heading towards Mumbai including Punjab Mail delayed; Overhead cable break at Igatpuri