प्रशिक्षण वर्ग : कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 30, 2014 22:13 IST2014-09-30T22:10:41+5:302014-09-30T22:13:23+5:30

कामाला ओझे न समजता कर्तव्य समजा

Training classes: Enhance employees' motivation | प्रशिक्षण वर्ग : कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न

प्रशिक्षण वर्ग : कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न

सिन्नर : निवडणूक कामाकडे ओझे म्हणून न बघता कर्मचाऱ्यांनी ते कर्तव्य समजून काम करावे, असे आवाहन सिन्नर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी केले.
सिन्नर मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी येथील भगवती लॉन्स येथे निवडणूक शाखेच्या वतीने प्रथम प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार खैरनार यांनी निवडणूक कामातील बारकावे समजावून सांगितले.
कर्मचाऱ्यांनी कामाकडे त्रास म्हणून न पाहता कर्तव्य समजून काम केल्यास त्यातून आनंद मिळेल असे ते म्हणाले. लोकशाही प्रक्रियेतला मतदान हा आत्मा आहे. त्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी तो त्रास समजू नये. हे काम मनापासून न केल्यास त्यात अनेकदा त्रुटी होतात व त्यातून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही वेळ येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करावे, असे आवाहन खैरनार यांनी केले.
यावेळी मतदार यंत्राची तपासणी, हाताळणी आणि सील करण्याच्या पद्धती याविषयी उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातूनही कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे यांनी निवडणूक प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण ठाकूर, मुख्याधिकारी संजय दुसाणे, प्रभाकर गोळेसर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Training classes: Enhance employees' motivation