शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज स्मारकासमोर वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST

--- जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर अस्वच्छता नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर सिग्नलपर्यंत साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर ...

---

जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर अस्वच्छता

नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर सिग्नलपर्यंत साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर रानगवताचा विळखा अन‌् ठिकठिकाणी बाकांभोवती कचरा साचल्याने अस्वच्छता पसरली आहे. या सायकलट्रॅकवर नियमितपणे स्वच्छता होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सायकल ट्रॅकचे सुशोभीकरण करण्याची गरज असून पथदीप बसविण्यात न आल्यामुळे रात्रीच्यावेळी येथे अंधाराचे साम्राज्य असते. सूर्यास्तानंतर सायकलपटुंना येथे फेरफटका मारताना कसरत करावी लागते.

---

गायकवाड सभागृहामागील रस्त्याची दूरवस्था

नाशिक : मुंबईनाका येथून वडाळा रोडला जोडणाऱ्या नासर्डी नदीकाठालगतच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामागील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. वारंवार तक्रार करूनदेखील केवळ ‘ठिगळ’ लावण्यापलीकडे कुठल्याही प्रकारची दखल महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी डांबरी ठिगळ लावल्याने रस्ता ओबडधोबड झाला आहे.

----

वडाळा गावात भटक्या श्वानांच्या झुंडी

नाशिक : वडाळा गाव परिसरात मागील काही दिवसापासून भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांच्या अंगावर धाव घेऊन किरकोळ स्वरुपात जखमी केल्याचीही घटना घडली होती. वडाळा गावातील रझा चौक, झीनतनगर, रामोशीवाडा, गरीब नवाज कॉलनी आदि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. मनपाने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

---

द्वारकेवर सिग्नलचे उल्लंघन

नाशिक : द्वारका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिग्नल यंंत्रणेचे बहुतांश वाहनचालकांकडून उल्लंघन केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे द्वारकेवर अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहतूक कोंडीही होत आहे. शहर वाहतूक पोलीस चौकात असो किंवा नसो द्वारकेवर एक तरी बाजूने वाहनचालकांकडून सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन होतानाचे चित्र पहावयास मिळते.

---