शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

घोटी बाजार समितीकडे व्यापाऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 17:07 IST

घोटी : भाजीपाला उत्पादनात अग्रेसर व तालुक्याच्या बहुतांश भागात बागायती पिके म्हणून टोमॅटोसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा माल वावरातच पडून असल्याने लाखोंचे नुकसान

घोटी : भाजीपाला उत्पादनात अग्रेसर व तालुक्याच्या बहुतांश भागात बागायती पिके म्हणून टोमॅटोसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र विकेंड निर्बंधामुळे व ठिकठिकाणी सुरु असलेला जनता कर्फ्युमुळे भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी विक्रीवर बंधने आली आहेत. मुंबईत विकेंड बंदमुळे बहूतांश व्यापारी बांधवांनी भाजीपाला खरेदीसाठी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे शेतकरी बांधवांचाही शेतमाल गेल्या दोन दिवसांपासून वावरातच पडून होता.दरम्यान इगतपुरी तालुक्यात भाजीपाला पिकांची, टोमॅटो, वांगे यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाव मात्र कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादित शेतमाल वाहतूक खर्चाला जड झाल्याने अनेक बहुतांश शेतकऱ्यांनी खुडलेला शेतमाल बंधावरच फेकून देत हतबलता व्यक्त केली.इगतपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला घोटी मार्केटच्या माध्यमातून मुंबईला निर्यात केला जातो. तर पूर्वेकडील बहुतांश शेतकरी आपला भाजीपाला नाशिक बाजार समितीत घेऊन जातात. त्यामुळे घोटी बाजार भाजीपाल्याची मोठी आवक वाढली आहे. मात्र विकेंडच्या निर्बंधामुळे मुंबई बंद असल्याने व्यापारी बांधव यांचे येणे दोन दिवस घोटी बाजारपेठेत येणे घटल्याने त्यातच मालाची आवकही वाढल्याने मालाचे भाव घसरले जात आहे तर मार्केटला व्यापारी कमी असल्याचे चित्र दिसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खुडलेला भाजीपाला वावरातच वाहने भरून ठेवली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड