सृष्टीला हिरवाईचे दान देणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहर परिसरात पाऊसधारा बरसल्या. काही दिवसांपासून शहरात पाऊस सुरू असला, तरी शनिवारी त्याने पूर्ण विश्रांती घेतली. रविवारी मात्र श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच आभाळ दाटून आले आणि श्रावणधारा कोसळू लागल्या. या पावसाच्या थेंबांचा स्पर्श अनुभवताना एक चिमुकला. शहराजवळच्या ग्रामीण भागातले हे दृश्य. शहरात घड्याळाच्या काट्यांवर धावणाऱ्या माणसांकडे असे निखळ क्षण अनुभवण्याची संवेदनशीलता लोप पावत असताना, ग्रामीण भागातील चिमुकल्याची ही निरागस कृती हेवा वाटायला लावणारीच...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}