लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 01:45 IST2022-06-27T01:44:52+5:302022-06-27T01:45:27+5:30

लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरोधात फिर्याद दिली

Tortured for two years by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

ठळक मुद्देसंशयिताला अटक : पोलिसांची पोस्कोंतर्गत कारवाई

सिडको : लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पोस्कोंतर्गत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी संशयिताविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयि अजित भोर याने पीडितेसोबत सलग तीन ते अडीच वर्षांच्या कालावधीत शारीरिक संबंध ठेवत गेल्या तीन वर्षांपासून लग्न न करता तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी संशयित आरोपी अजित भोर याने २०२० पासून ते दि. २४ जून २०२२ या कालावधीत वेळोवेळी पीडीत मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन तू मला खूप आवडतेस, तुझ्याशी लग्न करील असे सांगून तिचेवर वेळोवेळी शरीर सबंध ठेवले. तसेच त्याला जशी इच्छा होईल त्यावेळेस पीडित मुलीबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी तिला फोन करून प्रवृत्त केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीतून केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अजित भोर याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Web Title: Tortured for two years by showing the lure of marriage