रेशनवरील तूर डाळीची योजना संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:55+5:302021-02-05T05:42:55+5:30

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो गहू, तांदूळ तसेच एक किलो डाळ दिली जात होती. या योजनेत ...

Toor dal scheme on ration terminated | रेशनवरील तूर डाळीची योजना संपुष्टात

रेशनवरील तूर डाळीची योजना संपुष्टात

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो गहू, तांदूळ तसेच एक किलो डाळ दिली जात होती. या योजनेत चणा आणि तूर डाळ देण्यात आली. वास्तविक केवळ चणा डाळ देण्याची घेाषणाच सरकारने केली होती. परंतु नंतर तूर डाळ वाटपाला प्राधान्य देण्यात आले. योजना सुरू असतानाच्या कालावधीतदेखील डाळ वाटपाबाबतची अनियमितता निर्माण झाली होती. काही ठिकाणी डाळी पोहोचली तर काही भागात डाळ उपलब्धच झाली नाही. त्यामुळे अनेक कार्डधारक हे डाळीपासून वंचितच होते. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात डाळींचे वितरण झाले आता मात्र योजनाच नसल्याने डाळही मिळणार नाही.

काेरोनाच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राबविण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला एकदा मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीनुसार नोव्हेंबर अखेर मुदत संपुष्टात आली; परंतु ऑक्टोबर महिन्यातील धान्य उशिरा प्राप्त झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये मेाफत धान्य याेजनेचे वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे केंद्राकडून डिसेंबर अखेरची मुदत मागवून घेण्यात आली होती. आता ही योजनाच बंद झाल्यामुळे जानेवारीत कार्डधारकांना मोफतची डाळ उपलब्ध होऊ शकली नाही.

--इन्फो--

गहू आणि तांदूळ

मोफत धान्य योजना बंद झाल्यामुळे आता रेशनवर केवळ गहू, तांदूळ कार्डधारकांना मिळत आहे. अंत्योदय कार्डधारक वगळता अन्य कार्डधारकांना नियमानुसार गहू आणि तांदूळ यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यातील २,६०७ दुकानांमधून धान्यांचा पुरवठा केला जातो. सध्या धान्य वितरणात विस्कळीतपणा आला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे पंजाब, हरयाणातून येणाऱ्या धान्य वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.

--इन्फो--

जिल्ह्यात २ हजारच्या जवळपास रेशन धान्य दुकाने आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत मोफत धान्य योजनेचे वाटप सुरू होते. योजना नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली असली तरी योजेनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी दुकानदारांवर होती. त्यानुसार दुकानदारांनी वाढीव मुदत घेत डिसेंबर अखेरपर्यंत मोफत योजनेचे धान्य वाटप केले. जानेवारीपासून खऱ्य अर्थाने कार्डधारकांना डाळ मिळणे बंद झाले आहे. रेशनवर नियमित कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळत आहेच; पण मोफत डाळ मिळणे बंद झाले आहे.

Web Title: Toor dal scheme on ration terminated