नाशिक : पितृपंधरवड्याची अखेर अर्थात सर्वपित्री अमावास्येची जोरदार तयारी शहरात सर्वत्र पहायला मिळत असून आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची लगबग दिसून येणार आहे. दरम्यान, पितृपंधरवड्यामुळे खरेदीला विराम असल्याने शुकशुकाट असणाऱ्या बाजारपेठा नियमितपणे सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. गेल्या चौदा दिवसांपासून नाशिकचा गंगाघाट, त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त तीर्थ आदि ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी येऊन त्रीपिंडी, श्राद्ध, तर्पण, महालय, दानधर्म आदि अनेक विधी करीत आपल्या पूर्वजांच्या स्मृतीला वंदन केले. कर्मकांडांवर विश्वास नसलेल्या परंतु आपल्या पूर्वजांच्या स्मृतिनिमित्त काही तरी दानधर्म करू इच्छिणाऱ्यांनी अनाथाश्रम, बालकाश्रम, वसतिगृह आदि ठिकाणी वस्त्र, धान्य, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यावर भर दिल्याचेही दिसून आले. सर्वपित्री अमावास्येनिमित्त बाजारात केळीची पाने, डांगर, कारले, गवार आदि भाज्या, पत्रावळी, पूजेचे साहित्य आदिंची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री दिसून आली. शुक्रवारी श्राद्धाचा शेवटचा दिवस असल्याने बाजारात यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर काहीसे वाढलेले दिसून आले. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मोठा असल्याने विक्रेते समाधानी दिसले. (प्रतिनिधी)
आज सर्वपित्री अमावास्या, उद्यापासून बाजारपेठा गजबजणार
By admin | Updated: September 30, 2016 02:29 IST
उत्साहाचे वातावरण : पितृपंधरवड्यानंतर बाजारपेठेत चैतन्य
आज सर्वपित्री अमावास्या, उद्यापासून बाजारपेठा गजबजणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}