वणी येथे टायरचे दुकान फाेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 23:32 IST2021-10-31T23:31:27+5:302021-10-31T23:32:34+5:30
वणी येथील वणी-सापुतारा रस्त्यावर असलेल्या पारख ट्रेडिंग काॅम्प्लेक्समधील अष्टविनायक एमआरएफ टायर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील सर्व माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

वणी येथे टायरचे दुकान फाेडले
वणी : येथील वणी-सापुतारा रस्त्यावर असलेल्या पारख ट्रेडिंग काॅम्प्लेक्समधील अष्टविनायक एमआरएफ टायर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील सर्व माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
शनिवारी (दि. ३०) रात्री एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. टायरच्या दुकानाच्या शटरची कडी तोडून दुकानातील काचा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सीसीटीव्हीची यंत्रणेच्या वायर तोडून टाकण्यात आले. दुकानाला समोरून ट्रक लावून दुकानातील सर्व टायर्स तसेच टूल बाॅक्स गाडीत भरून रात्री चोरटे पसार झाले. सकाळी शेजारील दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने दुकानाचे मालक सचिन वाबळे यांना फोनवरून कळविले. दुकानमालक तातडीने नाशिकवरून आले. पोलिसांना खबर गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास यंत्रणा कामाला लागली आहे.